देशभरात आजपासून लसीकरण उत्सव विशेष अभियान सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजपासून लसीकरण उत्सवविशेष अभियानाला प्रारंभ झाला. आज ११ एप्रिल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून १४ एप्रिलला डॉक्टरबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. लसीकरण महोत्सवानिमित्त आजमुंबईकर विविध लशीकरण केंद्रांवर जाऊन लस घेत आहेत.

काल मुंबईला ९९ हजार लशींचा पुरवठा करण्यात आला. पुरेशा लस साठ्यामुळेमुंबईतल्या सर्व लशीकरण केंद्रांवर लशीकरण सुरळीत सुरू आहे. राज्यातल्या अन्यकेंद्रांवर देखील हेच चित्र बघायला मिळत आहे.