देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोना बाधीतांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असून सलग तिसऱ्या दिवशीही ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. काल देशभरात ३ लाख ४६ हजार ७८६ नवे कोरोनाबाधित आढळले.

देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६६ लाख १० हजार ४८१ झाली आहे.

काल दिवसभरात २ लाख १९ हजार ८३८ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८३ पूर्णांक ९२ दशांश टक्के इतकं आहे.

देशभरात आतापर्यंत १ लाख ८९ हजार पाचशे ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून काल दिवसभरात २ हजार ६२४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

सध्या देशात २५ लाख ५२ हजार ९४० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image