देशात नागरी सेवा दिन साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात नागरी सेवा दिन साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. अधिकारी वर्गानं व्यावसायिक क्षमतेचं दर्शन घडवत उत्कृष्ट कामगिरी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात देखील नागरीसेवांचं काम महत्वपूर्ण ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनीही आज नागरीसेवा दिनानिमित्त अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या. नागरी सेवेतले अधिकारी देशाच्या विविध क्षेत्रात नागरिकांची सेवा आणि देशाच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत अशा शब्दात मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.