क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन

 

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी नायब तहसीलदार श्रावण ताठे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.