गुढी पाडव्याचा सण घरीच साधेपणानं साजरा करावा - राज्यपालांचे आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसंच नववर्षानिमित्त निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणानं साजरा करावा, असं आवाहन त्यांनी केले.

हा सण तसंच आगामी नववर्ष सर्वांकरता सुख, उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. युगादी, चेती चाँद, बैसाखी तसंच सौसर पाडवो निमित्त देखील राज्यपालांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image