स्पेस एक्स कंपनीची चंद्र आणि मंगळासाठी दहावी मोहिम देखील अयशस्वी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी अवकाश कंपनी स्पेस एक्सने, अमेरिकेतील टेक्सास च्या बोका चिकाहून चाचणी प्रक्षेपण केलेलं ‘स्पेस-एक्स स्टारशिप’ हे मानव विरहित रॉकेट काल सुरक्षितपणे उतरू शकलं नाही.कंपनीचे अभियंते अपयशाच्या कारणांचा शोध घेत आहेत.चंद्र आणि मंगळावरील भविष्यातील मोहिमेत मनुष्य आणि 100 टन माल वाहून नेण्यासाठी, हेवी-लिफ्ट रॉकेट बनविण्याच्या चाचणी मालिकेतील ,स्टारशिप हे एक रॉकेट असल्याचं, कंपनीने म्हटलं आहे. यामुळे मानवाचा अंतराळातील प्रवास अधिक परवडणारा आणि सहज होणार आहे. स्पेसशिप रॉकेट मधील लॉंच वेहिकल हे पूर्णपणे पुन्हा वापरण्यायोग्य असणार आहे. यापूर्वी स्टार्शिप्स एसएन 8 आणि एसएन 9 च्या चाचणी दरम्यान लँडिंग करताना स्फोट झाला होता.एसएन 10 ने गेल्या महिन्यात व्यवस्थित लँडिंग साध्य केलं होतं,मात्र लॅंडींग नंतर आठच मिनिटांत तेही भस्मसात झालं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.