राज्यात ८० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ८० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं ठरलं आहे.

काल ४ लाख ३० हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा देण्यात आली. पुण्यात ७० हजारापेक्षा जास्त तर मुंबईत ५० हजारापेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली.