डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता साजरी करावी - रामदास आठवले यांचे आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियानं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वर्ल्ड साइन ऑफ ईक्वालिटी, समतेचे जागतिक प्रतीक म्हणून गौरव करत बाबासाहेबांची जयंती १४ एप्रिल समता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबिया राज्य सरकारचं आपण पत्र पाठवून अभिनंदन करत असल्याचं आठवले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केलं आहे.

यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता साजरी करण्याचं आवाहन आठवले यांनी केलं आहे.