ईस्टरनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा
• महेश आनंदा लोंढे
मुंबई:- महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा व त्यागाचा संदेश सर्वांकरिताच मार्गदर्शक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिश्चन बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो व कोरोनाविषयक खबरदारी पाळूनच हा पवित्र दिवस साजरा करण्याचे आवाहन करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.