संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड करण्यात आली आहे.

गुन्हेगारी आणि फौजदारी न्याय प्रतिबंधक आयोग, जागतिक अन्न कार्यक्रम आणि लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरण या समित्यांवर निवड झाली आहे. तीन वर्षांसाठी ही निवड असून १ जानेवारी २०२० पासून भारताचा कार्यकाळ सुरू होणार आहे.

ऑस्ट्रिया, बहरीन, बेलारूस, बल्गेरिया, कॅनडा, फ्रान्स, घाना, लिबिया, पाकिस्तान, कतार, थायलंड, टोगो आणि अमेरिका यांची संयुक्त राष्ट्रांकडून तर ब्राझील, डॉमिनिकन प्रजासत्ताक, पॅराग्वे, चिली, क्युबा यांची गुप्त मतदानाद्वारे निवड निवड करण्यात आली.

जागतिक अन्न कार्यक्रम समितीवर फ्रान्स, घाना, कोरिया प्रजासत्ताक, रशिया आणि स्वीडन यांची निवड करण्यात आली आहे. 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image