राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

त्यांनी स्वतः सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधोपचार घेत असून, लवकरच जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू होऊ, तसंच गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी तपासणी करुन स्वतःची काळजी घ्यावी असं मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.