कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची - नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्यानं महत्वाची भूमिका बजावत आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. नैनीतालच्या खीमानंद यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात प्रधानामंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. हवामानातल्या अनिश्चिततेची जोखीम पत्करत देशातले कोट्यावधी शेतकरी  आज या योजनेचा लाभ घेत आहेत, असंही मोदी म्हणाले. देशाच्या विकासात नागरिकांच्या योगदानाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी आभार व्यक्त केले.