कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते.

छोट्या शहरांमध्ये चाचण्याचं प्रमाण वाढवण्याची गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. लस हे कोरोनावरचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं ते म्हणाले.

परदेशातून येणाऱ्यांची कठोर चाचणी व्हावी. राज्यांनी झिरो वेस्टेज प्रणाली विकसित करावी. औषध आणि नियम हे सूत्र महत्वाचं आहे. कोरोना संबंधित नियमाबद्दल हलगर्जीपणा न करता, नियमांचं कठोर पालन करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.

कोणालाही बेजबाबदार राहून चालणार नाही. तसंच अफवा पसरवून भिती निर्माण करु नका, असंही मोदी म्हणाले.