मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर पंधरा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात, बीड जिल्ह्यातल्या चार, जालना जिल्ह्यातल्या दोन, तर लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात ३७१ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १९२, नांदेड ६९, बीड ८०, लातूर ४८, परभणी ५९, उस्मानाबाद १६ तर हिंगोली जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण आढळून आले.