पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया चेहा हिचा २१-११, २१-१७ असा पराभव केला. याआधी पुरुष दुहेरी गटात भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांच्या जोडीनंही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी अनिरुद्ध मयेकर आणि निखर गर्ग या भारतीय-ब्रिटीश जोडीचा केवळ १९ मिनिटात २१-७, २१-१० असा पराभव केला.
महिला दुहेरी गटातही भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी थायलंडच्या बेन्यापा ऐमसार्ड आणि नुनताकर्न ऐमसार्द या जोडीचा २१-१४, २१-१२ असा पराभव केला. पुरुष एकेरीत मात्र भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.