सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी - नवनीत राणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असां आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

आपल्याला दूरध्वनीवरून तसंच, शिवसेनेचं लेटरहेड वापरूनही अँसिड हल्ल्याची धमकी मिळाली असल्याचा आरोप राणा यांनीकेला आहे. अरविंद सावंत यांनी केवळ माझाच अपमान केला नसून देशातल्या सर्व महिलांचाअपमान केला असल्यानं त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे.