इंधन दरवाढीवरुन राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्याला आज सुरवात झाली. इंधन दरात होत असलेल्या वाढीचा मुद्दा राज्यसभेत विरोधकांनी मांडला. पेट्रोलचे दर १०० रुपये आणि डिझेलचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याचं विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

स्वयंपाकाच्या गॅसमध्येही लक्षणीय वाढ झाली असून सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे, असंही खर्गे म्हणाले. कॉँग्रेस आणि इतर विरोधकांनी हौद्यात धाव घेऊन चर्चेची मागणी केली आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली.

विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज आधी अकरा वाजेपर्यन्त आणि नंतर आजच्या उर्वरित कालावधीसाठी तहकूब करण्यात आलं.