कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

कोविड संक्रमण रोखण्यासाठी सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड १९ संबंधी मार्गदर्शक सूचनांबाबत जनजागृती करावी, असंही भल्ला यांनी सांगितलं आहे.