आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला क्रिकेट एकदिवसीय मालिका सुरू असून, त्यात मितालीनं हा विक्रम आपल्या नावी केला.

हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीआयनं ट्विट संदेशाद्वारे मितालीचं अभिनंदन केलं आहे.