भारत–अमेरिकेच्या नौदलाच्या संयुक्त सरावाला बंगालच्या उपसागरात आरंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत –अमेरिकेच्या नौदलाच्या पासेक्स या  संयुक्त सरावाला काल बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली. आज हा सराव समाप्त होणार आहे. भारताच्या नौदलानं शिवालिक आणि एअरक्राफ्ट पी 81 या सरावात सहभाग घेतला. गेल्या नोव्हेंबरमध्ये मलाबार सरावादरम्यान भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या नौदलांमध्ये निर्माण झालेली एकात्मता आणि सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी आणखी सराव आयोजित केला जात असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.