राष्ट्रपती नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल दुपारी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना बाय-पास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला आहे.

३० मार्च रोजी सकाळी ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. कोविंद यांची प्रकृती स्थिर असून एम्समधील तज्ञ डॉक्टर्स त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.