पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे. शनिवारी ग्रेट ब्रिटनला १ – १ असं बरोबरीत रोखल्यानंतर आता भारतीय संघ दौऱ्याची विजयी सांगता करण्यासाठी उत्सुक आहे.