राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला.

त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे २०१९-२० या वर्षाच्या तुलनेत यंदा सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात १ लाख ५६  हजार ९२५ रुपयांची घट अपेक्षित आहे.यंदा दरडोई राज्य उत्पन्न १ लाख ८८ हजार ७८४ रुपये अपेक्षित आहे.कृषी आणि सलंग्न कार्यक्षेत्रात यंदा ११ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे.मात्र उद्योगक्षेत्रात ही वाढ उणे ११ पूर्णांक ३ दशांश टक्के तर सेवाक्षेत्रात उणे ९ टक्के अपेक्षित आहे.

जून ते ऑक्टेबर-२०२० या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण ४ हजार ३७४ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली. केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ४ जानेवारी २०२१ पर्यंत राज्यातल्या १ कोटी २ लाख ५४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ९ हजार ४९६ कोटी ३८ लाख रुपये जमा करण्यात आले असं या अहवालात नमूद केले आहे.

सन-२०२० मध्ये ऑक्टोबरपर्यंत राज्यात ३७ हजार ८८७ कोटी रुपये प्रस्तावित गुंतवणुकीच्या २४७ प्रकल्पांची नोंदणी झाली. तर सप्टेंबरपर्यंत राज्यात थेट परदेशी गुंतवणूक २७ हजार १४३ कोटी रुपये होती. एप्रिल २००० पासून राज्यातली थेट परदेशी गुंतवणूक ८ लाख १८ हजार ५२२ कोटी रुपये असून, देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या २७ पूर्णांक ७ दशांश टक्के असल्याचं या अहवालात म्हटले आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image