देशातील २७ राज्यांमध्ये उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार सुरु असणार्या कोवीड१९ रुग्णांची संख्या आता अनेक राज्यांमध्ये वाढू लागली असून काल २७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये या संख्येत वाढ नोंदवली गेली. केवळ ९ राज्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. काल सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात २ हजार ८०३ इतकी नोंदवली गेली. तर रुग्ण संख्येतील सर्वाधिक घट केरळ मध्ये १५ शे ५४ इतकी नोंदवली गेली.
देशभरात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ या 2 राज्यांमध्येच आहेत. मात्र गेले काही दिवस केरळ मधली रुग्ण संख्या घटत असली तरी महाराष्ट्रातील मात्र वाढत आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.