देशातल्या नागरिकांनी टाकाऊ वस्तुंपासून नव्या वस्तुंची पुनःर्निमिती करावी - प्रकाश जावडेकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक टाकाऊ वस्तुंपासून पुननिर्मिती म्हणजेच जागतिक रिसायकल दिन. यानिमित्तानं पर्यावण, वनं आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उज्वल भविष्यासाठी, देशातल्या नागरिकांनी टाकाऊ वस्तुंपासून नव्या वस्तुंची पुननिर्मिती करावी, असं आवाहन केलं आहे. वस्तुंचा वापर कमी करणं, त्यांचा पुनर्वापर करणं, टाकाऊ वस्तुंपासून पुननिर्मिती करणं हा आपल्या जगण्याचा नवा मंत्र असायला हवा, असं जावडेकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.