नीट परीक्षा १ ऑगस्टला, ११ भाषांमधून होणार ही परीक्षा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा, म्हणजेच नीट परीक्षा यावर्षी १ ऑगस्टला होणार आहे. ११ भाषांमधून ही परीक्षा होणार असूनया परीक्षेबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल सांगितलं. यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळांवर नियमित भेट द्यावी, असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.