पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना ३ महिन्यांची मुदतवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ विरुद्धच्या लढ्यात महत्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली. 

या स्वच्छाग्रहींच्या नियुक्त्याची मुदत काल संपली. मात्र, कोरोनाचा प्रकोप अद्यापही संपलेला नसल्यानं त्यांना मुदतवाढ मिळावी अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. त्यानुसार आता स्वच्छाग्रहींना येत्या ३० जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.