देशात चोवीस तासात १८, ५९९ नवे कोरोनाबाधित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ६६ हजार लोकांना कोविड १९ वरील लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्यांची संख्या दोन कोटी नऊ लाख झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलं आहे.

दरम्यान, कोविड १९ चे १४ हजारांहून अधिक रुग्ण काल बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ९१ शतांश टक्के आहे. तर या कालावधीत १८ , ५९९ नवे कोरोनाबाधित आढळले त्यातले ११ हजारहून अधिक नवे रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत.

बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. देशात एक लाख ८८ , ७४७ रुग्ण उपचार घेत आहेत. काल ९७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकंदर संख्या एक लाख ५७ हजार आहे.