देशात काल १९ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १९ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं, देशाचा कोरोनामुक्ती दर ९६ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे.

आत्तापर्यंत देशभरातले एकूण १ कोटी ९ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.

देशात काल २४ हजार ८८२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं, एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १३ लाखापेक्षा जास्त झाली आहे.

देशात काल १४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ५८ हजाराच्या पुढे गेली आहे. सध्या देशभरात दोन लाखापेक्षा जास्त कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.