एंजल ब्रोकिंग तिसरे सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस बनले

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2021/01/Angel-Broking-Logo-1.png

मुंबई : उद्योगातील सर्वोच्च स्थानाकडे वाटचाल करणाऱ्या एंजल ब्रोकिंगने नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील सक्रीय ग्राहकांच्या स्तरावर तिसरे स्थान मिळवले. भारतातील चौथ्या क्रमांकाचे ब्रोकरेज हाऊस बनल्यानंतर एक वर्षापेक्षा कमी कालावधीतच ही प्रगती झाली. नव्या आकडेवारीची पातळी कंपनीची सातत्याने होत असलेली प्रगती दर्शवते, एकूण एडीटीओमध्ये तब्बल ४००५ अब्ज रुपयांची नोंद झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत सहापटींनी वाढ झाली.

एंजल ब्रोकिंगच्या एनएसईवरील सक्रीय ग्राहकांची संख्या चालू वित्तीय वर्षात २.५ पटींनी वाढली. तर एकूण ग्राहकांची संख्या २.१ पटींनी वाढलेली दिसून आली. कंपनीची ही वृद्धी डिजिटल-फर्स्ट स्ट्रॅटजीमुळे तसेच ट्रेडिंग व गुंतवणुकीत मिलेनिअल्सचा वाढता सहभाग यामुळे झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये, एंजल ब्रोकिंगच्या डिजिटल फर्स्ट दृष्टीकोनामुळे ०.२९ दशलक्ष एवढे सर्वाधिक ग्राहक जोडले गेले. वार्षिक स्तरावर ही ३५०.१% वृद्धी ठरली. अडीच दशकांच्या दीर्घ अनुभवात, एंजल ब्रोकिंगने प्रगती कायम ठेवत महत्त्वपूर्ण टप्पे गाठले. कंपनीने ग्राहकांना ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स, मोबाइल अॅप्सची सुविधा दिली तसेच या क्षेत्रातील अनेक सुविधा प्रथमच ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या.

फेब्रुवारी २०२१ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांची संख्या ३.७५ दशलक्षांपर्यंत पोहोचली. फेब्रुवारी २०२० मधील १.७१ दशलक्ष संख्येत ही ११९% ची वाढ ठरली. भारतीयांना अनेक असामान्य आधुनिक डिजिटल सेवांच्या जोरावर ही प्रगती साधली गेली.

एंजल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर, श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “ आमच्या ग्राहकांचा डिजिटल अनुभव वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. याचा यूझर-फ्रेंडली इंटरफेसही तरुण मिलेनिअल्स गुंतवणूकदारांच्या अपेक्षांनुसार आहे. यामुळे त्यांना ट्रेडिंगचा अनुभवही अखंड सुरु आहे. टॉप3 ब्रोकरेज हाऊस म्हणून प्रगती झाल्याबद्दल आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत. पुढील काही महिन्यांत त्यांच्या पाठिंब्याने आणखी उंची गाठण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

एंजल ब्रोकिंगचे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले, “एंजल ब्रोकिंगच्या काही दशकांच्या प्रयत्नानंतर ही प्रगती साधली आहे. सर्वात सामान्य वर्गापर्यंत तंत्रज्ञान पुरवण्याच्या आमच्या प्रयत्नांशी आम्ही सुसंगत राहिलो व त्याचे परिणाम आता मिळत आहेत. सर्व वयोगटातील व सामाजिक स्तरावरील भारतीय गुंतवणूकदारांना सर्वोत्तम सुविधा कोठेही मिळाल्या पाहिजेत. आम्ही त्यांच्यासाठी जागतिक पातळीवरील पर्याय पोहोचवण्याचा प्रयत्न करू.”

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image