भांडुप मॉल दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत भांडुप इथं मॉल आणि त्यातल्या रुग्णालयामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना दिले आहेत. पंधरा दिवसात सर्वंकष चौकशी करून अहवाल सादर करायला त्यांना सांगितलं आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून योग्य त्या शिफारशी करायलाही त्यांना सांगितलं आहे.