संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकार विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे.

संत नामदेवांचा जीवनपट उलगडून दाखवणारं नाटक, भक्ती महोत्सव, अभंगवाणी असे विविध कार्यक्रम मुंबई, पुणे, पंढरपूर, देहू आणि इतर ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.

संत नामदेवांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथं त्यांचं स्मारक उभारण्याच्या कामाला वेग आणण्याच्या सूचना सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.