भारतीय रिझर्व बँकेनं, बँकांचा पतपुरवठा आणि जमा ठेवींची आकडेवारी जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं, बँकांचा पतपुरवठा आणि जमा ठेवींची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार २६ फेबुवारीला संपलेल्या पंधरवड्यात  बँकांच्या पतपुरवठ्यात  ६ पूर्णांक ६३ शतांश टक्के इतकी वाढ  झाली असून एकूण जमा ठेवींमध्येही १२ पूर्णांक  ६ टक्के इतकी  वृद्धी झाली आहे.  या काळात बँकांनी १०७  कोटी ७५ लाख रुपयांची कर्ज दिली.

तर या कालावधीत १४९ कोटी ३४ लाख कोटींच्या ठेवी बँकांकडे जमा झाल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या  याच  कालावधीच्या  तुलनेत ही वाढ अधिक आहे. किरकोळ स्वरूपातल्या कर्जाच्या मागणीत वाढ झाल्यानं पतपुरवठ्यातली वाढ नोंदवल्याचं अर्थविश्लेषकांचं मत आहे.