देशात १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यामध्ये ६८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्र घेतली आहे, तर ३२ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ६० वर्षे वयावरील सुमारे २१ लाख नागरिकांनी, तर ४५ वर्षे वयावरील, सहव्याधीग्रस्त असलेल्या ३ लाख १३ हजार जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील लसीकरणाच्या ४९ व्या दिवशी काल १० लाख ३४ हजार ६७२ जणांना लस देण्यात आली.