७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कालअखेर कोविड-१९ वरील लसीच्या ५ कोटी ९४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता. काल रात्री ८ वाजेपर्यंत दिवसभरात १५ लाखहून अधिक लसीच्या मात्रा टोचण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं नवी दिल्ली इथं सांगितलं. केवळ ७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश ठरला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली. तर आघाडीवरील कोरोना योद्ध्यांचं लसीकरण २ फेब्रुवारीपासून सुरु झालं. एक मार्चपासून ६० वर्षांहून अधिक आणि सह-व्याधी असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली.
या टप्प्यातील केवळ २७ दिवसांमध्ये ६० वर्षांवरील २ कोटी ७३ लाख नागरिक आणि सह-व्याधी असलेले ४५ वर्षांवरील ६५ लाखांहून अधिक नागरिकांना कोविड-१९ वरील लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.