पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत भारतानं मालिकाही जिंकली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काल पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत ही मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून इंग्लंडनं ३२२ चं धावा केल्या.

सॅम कुर्रनची ९५ धावांची नाबाद खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही, मात्र कुर्रन सामनावीर ठरला. या मालिकेत २१९ धावा करणारा इंग्लंडचा सलामीचा फलंदाजी जॉनी बेअरस्टो मालिकावीर ठरला.