मुंबई : ऑफलाइन ते ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्म डॉटपेच्या डिजिटल शोरुम या उद्योगांना ऑनलाइन विक्रीसाठी मदत करणाऱ्या अॅपने केवळ ४ महिन्यांतच ४.५ दशलक्षांपेक्षा व्यावसायिकांची नोंदणी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केली. बिझनेस श्रेणीतील टॉप १० फ्री अॅपमध्ये याचे स्थान असल्याने या उत्पादनाने यूझर अधिग्रहणाच्या बाबतीत बाजारात अव्वल स्थान मिळवण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.
अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही सिस्टिमवर हे डिजिटल शोरुम उपलब्ध आहे. १५ सेकंदात कोणतेही शुल्क न आकारता भारतातील एसएमबींना त्यांचा उद्योग ऑनलाइन करण्याचे भारतातील चित्र नव्याने या प्लॅटफॉर्मद्वारे साकारले जात आहे. व्यावसायिकांना त्यांचे ऑनलाइन स्टोअर तयार करण्यासाठी केवळ दुकानाचे नाव, नंबर आणि पत्ता लिहावा लागतो. एकदा ऑनलाइन स्टोअर तयार केल्यानंतर, डिजिटल शोरुमद्वारे व्यावसायिकांना अनेक सुविधा पुरवल्या जातात. यात फ्री कॅटलॉग लिस्टिंग, डिजिटल पद्धतीने ऑर्डर स्वीकारणे, सोशल मीडिया मार्केटिंग टूल्स आणि ऑनलाइन पेमेंट पर्याय आदींचा समावेश आहे. किराणा दुकानांपासून महिलांच्या स्वतंत्र व्यवसायांपर्यंत, कोणत्याही व्यवसायात डिजिटल शोरुम डिजिटल क्रांती आणत आहे. याद्वारे भारतातील प्रत्येक महत्त्वाकांक्षी उद्योजकाला एक पाऊल पुढे टाकण्यास मदत होते.
डॉटपेचे सह संस्थापक, शैलझ नाग म्हणाले, “आमच्या प्लॅटफॉर्मवर वेगाने वाढणारा मर्चंट इन्स्टॉल रेट हा भारतातील विकसनशील वाणिज्य क्षेत्राचा दाखला आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या डिजिटल स्टोअरफ्रंटचे मूल्य वाढताना दिसत आहे. विविध व्यवसाय श्रेणीतील व्यापपाऱ्यांची गरज ओळखून डिजिटल शोरुमने एक खूप किफायतशीर आणि अडथळा-विरहित प्लॅटफॉर्म तयार केला. आमच्या प्रयत्नांचे हेच प्रमाण आहे. पण ही तर खरी सुरुवात आहे. आम्ही १.३ अब्जांपेक्षा जास्त संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधण्याकरिता 70 दशलक्षांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना सक्षम करण्याचे नियोजन करीत आहोत.”
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.