किसान रेल्वेद्वारे 1 लाख 20 हजार टनापेक्षा जास्त शेतमालाची वाहतूक करण्यात येत आहे - पियुष गोयल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सध्या 43 मार्गांवर 373 किसान रेल्वे सुरु असून , त्याद्वारे 1 लाख 20 हजार टनापेक्षा जास्त शेतमालाची वाहतूक करण्यात येत आहे , अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल राज्यसभेत एका प्रश्रानाच्या लेखी उत्तरात दिली . देशात किसान रेल शेतकरी आणि कृषी मालाच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरली असून, यामुळे नाशवंत कृषी मालाची देशाच्या कोनाकोपऱ्यात वाहतूक करण सुलभ झालं आहे. या किसान रेल्वेगाड्या मुख्यतः, देवळाली , सांगोला , सांगली , डहाणू रोड , नगरसोल , धोराजी, महूवा आदी लहान रेल्वे स्थानकांपासून सुरु होत असून, ती मार्गावरील अनेक लहान स्थानकात थांबतात आणि कृषी माल भरण्यासाठी पुरेसा वेळही देतात अशी माहिती ही गोयल यांनी दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.