सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: सरकारी मालकीची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला डिसेंबरमध्ये संपलेल्या तिस-या तिमाहीत निव्वळ नफ्यात १६५.४१ कोटी रुपयांचा नफा झाला. बॅंकेने निव्वळ नफ्यात ६.५ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. त्यापैकी क्राय(चाईल्ड राइट्स अँड यू) या संस्थेला बॅंकेने १८.३५ लाख रुपयांचा धनादेश सोपविला. २२९० वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रायोजित म्हणून १ वर्षासाठी हा धनादेश सोपविण्यात आला आहे.
बॅंक आणि टाटा एआयए या बॅंकेच्या विमा भागीदारांनी क्रायच्या माध्यमातून वंचित मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी सामाजिक कारणास्तव संपूर्ण भारतभर जीवन विमा पॉलिसी लागू करण्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये एक सुनहरा बचपन चॅम्पियन हा उपक्रम चालविला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.