देशातल्या पहिल्या राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होईल. येत्या २ मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्यादृष्टीने संवादाला चालना देणे तसंच भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. यात देशभरातले ऑनलाईन खेळ जगतातले उद्योजकही सहभागी झाले आहेत. अमरावतीतल्या रिझो स्टुडिओ या स्टार्टअपनेही यात भाग घेतला आहे