पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यासाठी कर कमी करावेत - देवेंद्र फडनवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यासाठी राज्य सरकारनं त्यावरचे कर कमी करावेत अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेनं राज्यभर सुरु केलेल्या आंदोलनाविरोधात नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

आपल्या सत्ता काळातही पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता, असं त्यांनी सांगितलं. यावेळी फडनवीस यांनी वीज जोडण्या तोडण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आणि त्याविरोधात राज्यभर निदर्शनं करायचा इशाराही दिला.