नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना आणखी एक संधी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, केंद्रीय नागरी सेवा आयोगाची परीक्षा दिल्या आहेत, आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा इच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.

मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा ओलांडली आहे, अशांना ही सुविधा लागू होणार नाही, असे देखील सरकारनं न्यायालयात स्पष्टं केलं आहे. 

कोरोना साथीच्या काळात, परीक्षेची पुरेशी तयारी झाली नसल्याने, परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी सरकारने अमान्य केली होती, त्यामुळे परीक्षा देणं भाग पडलं. त्यामुळेच, आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

आकडेवारीनुसार, ३ हजार ८६३ उमेदवारांची परीक्षा देण्याची संधी संख्या संपली असून, २ हजार २३६ उमेदवार वयोमार्यादेमुळे बाद झाले आहेत.