सिंधुदुर्ग एस एस पी एम मेडिकल कॉलेजच उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं खासदार नारायण राणे यांच्या एस एस पी एम मेडिकल कॉलेजच उद्घाटन आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं.

या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसंच राजकीय, उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित होती.