राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत बीन व्याजी कर्ज दिलं जाणार- उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत बीन व्याजी कर्ज तर, तीन लाखांपर्यंतचं कर्ज देान टक्के व्याजानं दिलं जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. 

दिल्लीत कृषी कायद्यावरून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केंद्र शासनानं त्वरीत हस्तक्षेप करावा, त्याच बरोबर मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी दोन पावलं मागे घ्यावीत, असं आवाहन पवार यांनी केलं.

नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो उभारणीत राज्य सरकार आपला वाटा देईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. नाशिक विभागातल्या पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी तुट आली असतानाही मध्यममार्ग काढून जिल्ह्यांना विकासासाठी निधी दिला असल्याचं ते म्हणाले.