देशात आतापर्यंत १ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोरोनाप्रतिबंधक लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोरोनाप्रतिबंधक लसीच्या १ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.

काल ८ लाख १ हजार ४८० मात्रा आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कोरोना योद्ध्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.देशात कोविड-१९ चे रुग्ण  बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १७ शतांश टक्के झाला आहे.

काल १२ हजार १८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १६ हजार ५७७ नवे रुग्ण आढळले, तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला. देशातली कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ५६ हजाराच्यावर पोचली आहे. देशात आतापर्यंत आतापर्यंत १ कोटी ७ लाख ५० हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १ लाख ५५ हजार ९८६ रूग्णांवर उपचार सुरु आहेत.