आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी देशातल्या खेळण्यांच्या पहिल्या प्रदर्शनाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक उत्पादकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाचा भाग म्हणून देशातल्या पहिलं खेळण्यांचं प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

देशातल्या खेळणी उत्पादक कंपन्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून आज या प्रदर्शनाच्या www.theindiatoyfair.in या संकेतस्थळाचं प्रकाशन केंद्रिय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरीयाल निशंक, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत करण्यात आलं.

इंडीया टॉय फेअर २०२१ या दूरदृश्य प्रदर्शनात मुलं, पालक, शिक्षक, खेळणीउत्पादक सहभागी होऊ शकणार आहेत.