भोसरीचा समाधान दगडे आणि आकुर्डीचा संकेत चव्हाण यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

 

पिंपरी : कै. वस्ताद बाळासाहेब गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गट, माती विभागातून भोसरीचा पै. समाधान दगडे आणि गादी विभागातून आकुर्डीचा पै. संकेत चव्हाण यांची निवड झाली आहे.

मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) रहाटणी येथिल थोपटे लॉन्स मध्ये महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाल्या. कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रेक्षकांशिवाय कुस्तीस्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्‌घाटन भारत केसरी पै. विजय गावडे, ललित लांडगे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, ज्ञानेश्वर कुटे, विशाल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या पहिलवानांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे हणूमंत गावडे आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच रहाटणी गावचे माजी सरपंच पै. गोविंदराव तांबे (वय 83 वर्षे) यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरचिटणीस संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, आदींसह शहरातील प्रमुख वस्ताद उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे : माती विभाग - खुला गट - 86 किलो ते 125 किलो महाराष्ट्र केसरी गट, प्रथम क्रमांक विजयी समाधान दगडे (भोसरी) 8 गुण विरुध्द निखिल नलावडे (चिंचवड) 2 गुण ; 57 किलो गट - विजयी जय वाळके विरुध्द किरण माने ; 61 किलो गट - विजयी चेतन कलापुरे विरुध्द महेंद्र बनकर ; 65 किलो गट - विजयी परशूराम कँम्प विरुध्द अमित काकडे ; 70 किलो गट - विजयी राजू हिप्परकर विरुध्द सनी जाधव ; 74 किलो गट - विजयी पवन माने विरुध्द कोणार्क काकडे ; 79 किलो गट - विजयी रविंद्र गोरड विरुध्द संकेत जाधव ; 86 किलो गट - विजयी सुरज देवकर विरुध्द अनिकेत लांडे ; 92 किलो गट - विजयी धनंजय शेळके विरुध्द सौरभ घेनंद ; 97 किलो गट - विजयी संकेत घाडगे विरुध्द कुणाल शेवाळे ;

गादी विभाग खुला गट : 86 किलो ते 125 किलो महाराष्ट्र केसरी गट, प्रथम क्रमांक संकेत चव्हाण (आकुर्डी) विरुध्द प्रतिक चिंचवडे (चिंचवड) संकेत चव्हाण याने प्रतिक चिंचवडे याला चितपट करुन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रवेश निश्चित केला ; 57 किलो गट - विजयी ऋतिक नखाते विरुध्द अनिकेत देवताळू ; 61 किलो गट - विजयी विशाल सोंडकर विरुध्द हर्षद पालवे ; 65 किलो गट - विजयी समर्थ गायकवाड विरुध्द राज बालवडकर ; 70 किलो गट - विजयी योगेश्वर तापकीर विरुध्द गौरव हिंग ; 74 किलो गट - विजयी ओंकार जाधव विरुध्द साईश जाचक ; 79 किलो गट - विजयी पृथ्वी भोईर विरुध्द यश थोरवे ; 86 किलो गट - विजयी देवांग चिंचवडे विरुध्द शेखर शिंदे ; 92 किलो गट - विजयी प्रसाद सस्ते विरुध्द विजय पवार ; 97 किलो गट - विजयी निरंजन बालवडकर विरुध्द रोहित माकर याप्रमाणे आहे.