कोविड-१९ लसीकरणाच्या मल्टीमिडिया जनजागृती व्हॅनद्वारा फिल्म्स डिविजनच्या अभियानाला सुरुवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मल्टीमिडीया प्रदर्शनी व्हॅनला राज्यशासनाचे मुख्य आरोग्य सचिव डॉ प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवून आज या अभियानाची फिल्मस डिविजन मुंबई इथं सुरुवात केली.

फिल्म्स डिविजनद्वारे मल्टी प्रदर्शनी जनजागृती व्हॅन हा स्त्यूत उपक्रम आहे. विशेषतः मुंबईतली रेल्वे सुरु झाल्यापासून मुंबईमधे कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन  महाराष्ट्रातली लोकसंख्या बघता अजूनही त्रिसूत्रीचं पालन करणं गरजेचं आहे. तसंच लसीकरणासंदर्भात तज्ज्ञांकडून योग्य माहिती आणि अफवांवर विश्वास न ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रदीप कुमार व्यास यावेळी म्हणाले.

मुंबईमधे फिरणारी जनजागृती ही व्हॅन ३ मार्गांद्वारे फिरेल पहिला मार्ग बांद्रा- धारावी, जुहू-अंधेरी, बोरीवली, दुसरा मार्ग -गोरेगाव चिचोंली, मालाड, कांदिवली, चारकोप बोरीवली –दहीसर तर तिसरा मार्ग-कुर्ला- चेंबूर- घाटकोपर, मानखुर्द, तुर्भे-भांडूप आणि विक्रोळी असा असेल.

महाराष्ट्रातल्या ३६ जिल्ह्यांमधेही सुद्धा खास तयार केलेल्या १६ व्हॅनद्वारे जनजागृती संदेश पोहोचवण्यात येणार आहे.यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे पश्चिम विभाग महासंचालक मनीष देसाई आणि चित्रपट विभागाच्या महसंचालिका स्मिता वत्स शर्मा, जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ विवेक परदेशी उपस्थित होते.