बारामतीमध्ये 'माझा व्यवसाय, माझा हक्क' या उपक्रमाची सुरुवात

 

पुणे (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून, पाच वर्षात एक लाख सुक्ष्म आणि लघुउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

बारामती इथे विद्या प्रतिष्ठान संस्थेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत, 'माझा व्यवसाय, माझा हक्क', या उपक्रमाची सुरुवात पवार यांच्या उपस्थितीत काल झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल, रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासोबतच, ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा आणि समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून, उत्पादन, सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसायांमध्ये युवकांना आणि युवतींना संधी मिळतील, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.