अर्थसंकल्पात राज्यातल्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५, ९७६ कोटी, तर नाशिक मेट्रोसाठी २,०९२ कोटी रुपयांची तरतूद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातल्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. मेट्रो २ मध्ये नवे तंत्रज्ञान आणायची घोषणाही त्यांनी केली.

रेल्वे मंत्रालयासाठी १ लाख १० हजार ५५ कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा सीतरमण यांनी केली.

रेल्वेच्या विकासासाठी भारतीय रेल्वेने राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार केली आहे. या योजनेअंतर्ग भविष्यात रेल्वेसेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरणाचे काम, डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केलं जाईल, मानवी चूकांमुळे होणारे रेल्वे अपघात टाळण्यासाठी, उच्च घनतेचे रेल्वे जाळे आणि सर्वाधिक वापराच्या रेल्वे मार्गांवर स्वदेशी बनावटीचे स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली दिली जाईल अशी घोषणा सीतारमण यांनी केली.